या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
🪔दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🪔
शरद ऋतूच्या मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हा वा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.🔆 असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
दहावीचा निकाल उद्या दु 1.00 वा जाहिर होणार
दहावीचा निकाल उद्या दु 1.00 वा जाहिर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. निकाल पाहण्यासाठीच्या लिंक : mahresult.nic.in https://ssc.mahresults.org.in http://sscresult.mkcl.org #SSCRESULT #10THRESULT

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा