🪔दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🪔
.jpeg)
शरद ऋतूच्या मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हा वा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.🔆 असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.